पुण्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी एका सोसायटीसमोर थांबलेल्या दोघांवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यु झाला, तर दूसरा तरुण गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी (ता.22)रात्री साडे अकरा वाजता येरवडा येथे घडली. दरम्यान हा प्रकार पूर्ववैमनस्यतुन घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

 नेहाल लोंढे असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून राहुल कांबले असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहाल व राहुल हे दोघेही बुधवारी रात्री साडे अकरा वाजता येरवडा येथील पर्णकुटी सोसायटीसमोर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन चौघेजण आले. त्यांनी नेहालवर धारदार शस्त्रने वार केले. त्याचबरोबर राहुल याच्यावरही हल्ला चढविला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.दरम्यान स्थानिक नागरीकांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानंतर नागरिक व पोलिसांनी दोघांना उपचारासाठी रुग्णलयात नेले. त्यापूर्वीच नेहालचा मृत्यु झाला होता. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिस हल्लेखोराचा माग काढत आहेत.

Web Title: premeditate attack on two in Pune; Death of one

टॅग्स