महापालिकेचा पूरनियंत्रण कृती आराखडा तयार 

दीपेश सुराणा
बुधवार, 13 जून 2018

पिंपरी - शहरात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेचे विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालयांकडे कामकाजाचे वाटप केले आहे. 

पिंपरी - शहरात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेचे विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालयांकडे कामकाजाचे वाटप केले आहे. 

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षासाठी 24 तास वायरलेस ऑपरेटर, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पूरनियंत्रण कक्षासाठी 24 तास अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अग्निशामक विभागाने आवश्‍यक सर्व बचावाची उपकरणे, वाहने व साहित्य चांगल्या स्थितीत ठेवावे. आवश्‍यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. पूरस्थितीत नदीघाटावर व नेमणुकीच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करावे. स्थापत्य, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करावी. महापालिका हद्दीतील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे. अतिक्रमण विभागाचे एक वाहन 24 तास अधिकारी व कर्मचाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यालयात सज्ज ठेवावे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. नदीकाठी व नदीवरील पुलावर पाणी पातळीदर्शक फलक लावावे. वैद्यकीय विभागाने महापालिका रुग्णालये, दवाखान्यांमध्ये वैद्यकीय व्यवस्था सुसज्ज ठेवावी. आरोग्य विभागाने साथीचे आजार पसरू नये, यासाठी औषध फवारणी करावी, आदी सूचना आराखड्यात केल्या आहेत. 

पुरामुळे संभाव्य बाधित होणारे भाग : 
क्षेत्रीय कार्यालय भाग 
अ माता रमाबाई नगर, भाटनगर, बौद्धनगर परिसर (पवना नदीकाठावरील) 
ब केशवनगर, मोरया गोसावी मंदिर परिसर (पवना नदीकाठावरील) 
ड पवना नदीकाठावरील पिंपळेगुरव परिसर 
ई बोपखेल गावठाण, केशवनगर नदीकाठचा परिसर 
ग पवना नदीकाठावरील संजय गांधीनगर, पिंपरी, रहाटणी परिसर 
ह मधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, दापोडी बौद्धविहार व स्मशानभूमी परिसर, 
पवना वस्ती, पवना व मुळानगर, मुळा नदीकाठावरील परिसर 

पूर पातळी (क्‍यूसेक्‍समध्ये) : 
पूर पातळी पवना इतर नद्या 
1) सामान्य : 10 हजार 900 10 हजार 
2) सतर्कतेची (अलर्ट) : 16 हजार 200 20 हजार 
3) धोक्‍याची पातळी : 35 हजार 40 हजार 
4) आपत्कालीन स्थिती : 55 हजार 800 60 हजार 

वार्षिक पर्जन्यमान (पाऊस- मि.मी.मध्ये) 
वर्ष पर्जन्यमान 
2013 4057 
2014 2508 
2015 1862 
2016 1927 
2017 3570 

"शहरात संभाव्य पूरस्थितीत जिवीत किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय कार्यालयनिहाय पूरनियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.'' 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त 

Web Title: Preparation of flood control action plan of municipal corporation