पुणे : 'या' मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्याचा विश्वास; फ्लेक्सबोर्ड छापून तयार

राजकुमार थोरात
Wednesday, 23 October 2019

इंदापूरमध्ये भरणे व पाटील यांच्या कार्यकर्त्याकडून विजयोत्सवाची तयारी...
५ ते १५ हजार मताधिक्यांनी विजयी होणार असल्याचा दोन्ही पक्षाचा दावा...

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या निवडणूकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे दावे करीत आहेत. ५ ते १५ हजारांचा मताधिक्यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याच्या चर्चा गावोगावी सुरु असून फ्लेक्सबोर्ड छापून तयार ठेवले आहेत. विजयउत्सावाची  जोरदार तयारी  सुरु केली आहे.

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दत्तात्रेय भरणे यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली.दोघांनीही विजयासाठी तालुका पिंजून काढला होता.तालुक्यातील २ लाख २९ हजार ४९८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या विधानसभेच्या तुलनेमध्ये मतदान वाढले असले तरीही वाढलेल्या मतदानाच्या तुलनेत सुमारे ३ टक्कांनी मतदान कमी झाले आहे. मतदानाचा दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती.मात्र तरीही मतदान कमी झालेल्याने  कमी झालेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणूकीच्या निकालानंतर समजणार आहे. मतनादानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आकडेमोड  करुन विजयाचा दावा करीत आहेत.

Image result for datta bharane

बावडा-लाखेवाडी व सणसर-लासुर्णे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये हर्षवर्धन पाटील यांना हमखास मताधिक्य मिळणार आहे.तर वालचंदनगर - कळस व पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटामध्ये दत्तात्रेय भरणे यांना मताधिक्य मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. उर्वर्रित तीन जिल्हा परिषद गटामध्ये थोड्याफार फरकाने समसमान मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यिात येत आहे.  भरणे व पाटील यांच्या कार्यकर्तेकडून ५ हजार ते १५ हजापर्यंत मताधिक्यांनी विजय आमचाच होणार असल्याचा दावा करण्यात येत असून कार्यकर्त्यांनी विजयउत्सवाची तयारी केली आहे. यासाठी गुलाब व तोफांचे नियोजन केले असून विजयउत्सावाचे फ्लेक्सबोर्ड छापून तयार ठेवले आहेत.

Image result for harshvardhan patil

इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भरणे व पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक पुन्हा सुरु राहणार याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for victory by NCp and BJP Party Workers in Indapur