सुटीत स्वत: तयार करा रोबोट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीच्या निमित्ताने मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ‘सकाळ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’ यांनी रोबोटिक्‍स कार्यशाळा आयोजित केली आहे. येत्या शनिवारी (ता.१२) आणि रविवारी (ती.१३) ही कार्यशाळा ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील कार्यालयात होणार आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स गाड्या, रिमोट सेन्सरवर चालणाऱ्या खेळण्यांचे मुलांना नेहमीच आकर्षण असते. अशा खेळण्याशी खेळण्याबरोबर ती चालतात कशी याविषयीही त्यांना जास्त कुतूहल असते. कार्यशाळेत मुलांना मल्टी युझेबल किट देण्यात येणार असून, त्याच्या साह्याने प्रोग्रामिंग व अल्गोरीदमचा वापर करून मुले मोबाईल ऑपरेटेड रोबो तयार करतील. त्याशिवाय हे कीट वापरून दहापेक्षा जास्त वेगवेगळे प्रोजेक्‍ट तयार करता येतात. यासाठीचा प्रोग्रामिंग डेटा मुलांना  पेन ड्राइव्हमध्ये घेऊन जाता येणार आहे.

कार्यशाळा पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मोबाईल ऑपरेटेड रोबोटिक्‍स कार्यशाळा
 कोठे : सकाळ, बुधवार पेठ कार्यालय, पुणे
 कधी : शनिवार (ता. १२) व रविवार (ता. १३) 
 केव्हा : सकाळी ११ ते सायंकाळी ५ 
 वयोमर्यादा : १२ ते २० वर्षे
 सर्व साहित्यासह शुल्क :  रु. २०००/-
 नोंदणी : शिवाजीनगर सकाळ कार्यालय (स. ११ ते सायं. ५)
 संपर्क : ९५५२५३३७१३, ८८०५००९३९५ 

महत्त्वाचे 
रोबोचे खालील प्रकार शिकायला मिळणार 
 ट्रॅक फॉलोअर रोबोट    वॉल फॉलोअर रोबोट
 लाइट सर्चिंग रोबोट     मोबाईल ऑपरेटेड रोबोट

Web Title: Prepare Yourself Robot