वरुणराजाच्या कृपेने शेतातील पिकांना होणार हा फायदा 

khed
khed

चास (पुणे) : कोरोनाची महामारी, पावासाने मारलेली दडी व कडक उन्हामुळे शेतांमध्ये सुकायला लागलेल्या खरिप हंगामातील भाताच्या पिकामुळे हवालदिल झालेल्या बळीराजासह नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने दिलासा दिला असून, भाताच्या पिकाला जिवदान मिळाले आहे. तसेच, खरिपातील अन्य पिकांना संजिवनी मिळाली आहे. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 
    
खेड तालुक्याचा पश्चिम आदिवासी पट्टा हे भाताचे आगार असून, खरिप हंगामात 3200 ते 3300 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. चालू वर्षी वेळेवर पावासाचे आगमन झाल्याने बळीराजाने भाताच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यास प्राधान्य दिले. रोपे लागवडीसाठी तयार झाली व पावसाने दडी मारली. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी विहिर, तळे, नदिपात्रातून उपलब्ध झालेल्या पाण्यातून भाताच्या लागवडी केल्या व ज्यांना पाणी देणे शक्य नव्हते, त्यांनी आभाळाकडे डोळे लावले. पावसाचे आगमन न झाल्याने लागवड झालेली भाताची पिके पाण्याअभावी जळू लागली. तर, ज्यांच्या लागवडी रखडल्या होत्या, त्यांनी रोपे उपटून पाऊस झालाच, तर अन्य पिके घेण्याची तयारी केली. 

आव्हाट, टोकावडे व परिसरातील शेतकरी चिमाजी भागीत, सिताराम शिंगाडे, जनाजी शिंगाडे, ज्ञानेश्वर शिंगाडे, चिंधू तळपे, नंदकुमार गोपाळे, शुभम केदारी, पांडुरंग जठार, राजेंद्र वाळुंज यांसह अन्य शेतकऱ्यांनी तर भाताच्या पिकावरच्या आशाच सोडल्या होत्या. शेतकरी अशा द्विधा मनस्थितीत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून पिकांना संजिवनी दिली आहे. आवश्यक पाऊस होत असल्याने भातरोपे तरारली असून, सुकायला लागलेली रोपे पुन्हा हिरवीगार होण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस सुरू झाल्याने बळीराजाला भाताच्या पिकापासून उत्पादन मिळण्याची आशा उत्पन्न झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com