यशवंतराव चव्हाण यांच्यावरील लेखांचे प्रदर्शन

Yashwantrao-Chavan
Yashwantrao-Chavan

पिंपरी - महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा आजच्या युवा पिढीला परिचय व्हावा, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी संकलित केलेल्या लेखांचे प्रदर्शन पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात भरविण्यात आले आहे. रविवारी (ता. २५) या प्रदर्शनाचे उद्‌घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते झाले. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघिरे आणि पदाधिकारी उपस्थित होते. सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. 

यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन बोऱ्हाडे यांनी केले आहे. त्यामध्ये १९८४ ते २००४ या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या लेखांचा समावेश आहे. यशवंतरावांच्या जीवन प्रवासाची माहिती नव्या पिढीला होणे आवश्‍यक आहे. त्यांचे विचार आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती. यशवंतरावांनी केलेल्या कामाबद्दल राज्यातील अनेकांनी विचार मांडले आहेत, त्यामधून त्यांच्या राजकारणाचा परिचय सर्वांना होतो. या प्रदर्शनामध्ये ११० लेख मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लेखांचे डिजिटलायझेशन करणार
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी ३५० लेख माझ्या संग्रहात आहेत. तरुण पिढीसाठी हे लेख उपयुक्‍त ठरणारे आहेत, त्यामुळे या सर्व लेखांचे डिजिटलायझेशन करण्याचे ठरविले आहे. काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण करणार असल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com