आंतरराष्ट्रीय परिसंवादात २६० शोधनिबंध सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

औद्योगिक शिक्षण मंडळ, चिंचवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनगोईंग रिसर्च इन मॅनेजमेंट ॲण्ड आयटी या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला. यात २६० शोधनिबंध सादर केले.

पिंपरी - औद्योगिक शिक्षण मंडळ, चिंचवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनगोईंग रिसर्च इन मॅनेजमेंट ॲण्ड आयटी या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला. यात २६० शोधनिबंध सादर केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या परिसंवादाचे उद्‌घाटन स्प्रिंजर नेचर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव गोस्वामी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. आशा पाचपांडे, मुंबई आयआयटीचे पद्‌मश्री डॉ. दीपक पाठक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये 'दादागिरी’त कोणाचे प्राबल्य?

डॉ. गोस्वामी यांनी डिजिटल इंडिया, कम्युनिकेशन लर्निंग, न्यू बझ्झ वर्डस, डेटा ॲनॅलिसिस, रोबोटिक, मशिन लर्निंगबद्दल माहिती दिली. डॉ. प्रसाद पाठक यांनी ग्लोबल वातावरणाबाबत माहिती देत स्मार्ट सिटी, प्रदूषण, शहरी उष्णतेचे आयलॅंड, हवा आणि तापमानाबाबत मार्गदर्शन केले.

पुण्यात तलावाजवळ फेकलेल्या जुळ्यांचे आई-वडील सापडले; बाळांची आई विधवा

आदित्य पाचपांडे यांनी अलेक्‍सारोबोटमधील आवाजाद्वारे नवीन शिकण्याची पद्धत तसेच डिझाईन टू टेस्टबाबत माहिती दिली. या वेळी डॉ. विजय खोले यांनी सांगितले, ‘रिसर्च स्कॉलरशिपसाठी आंतरराष्ट्रीय परिसंवाद हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. सोशल डायमेन्शनप्रमाणे शिकविण्याच्या पद्धती शिकावी. फक्‍त पदवी घेऊन उपयोग नसून रिसर्च पोटेंशियल असायला पाहिजे.’ अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, ‘‘पेटंट फाईलिंगमध्ये इतर देशापेक्षा अमेरिका अग्रेसर आहे.’

उन्हाळी सुट्यांचे करा बुकिंग!

डॉ. रोनाल्ड न्यूटन, डॉ. मायकल गारसीआ, डॉ. मार्गारेट मोरी, डॉ. पराग काळकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.  अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी स्वागत केले. डॉ. व्ही. पी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. आयबीएमआर रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presenting 260 dissertations at international seminar