हडपसर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. शंतनू जगदाळे

संदीप जगदाळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

हडपसर - हडपसर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. शंतनू जगदाळे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी डॉ. सचिन आबणे तर कोषाध्यक्ष पदी डॉ. प्रशांत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

हडपसर - हडपसर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. शंतनू जगदाळे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी डॉ. सचिन आबणे तर कोषाध्यक्ष पदी डॉ. प्रशांत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

कार्यकारिणीत डॉ. मंगेश वाघ, डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. वैभव वनारसे, डॉ. मनोज कुंभार, डॉ. वंदना आबणे, डॉ. सुनिता घुले, डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. इलियास मोमीन, डॉ. अजय माने, डॉ. अनुराधा जाधव, डॉ. अतुल कांबळे, डॉ. सतिश सोनवणे, डॉ. हर्षवर्धन म्हात्रे, डॉ. जयदीप फरांदे, डॉ. अनिता गवळी. डॉ. दिपक भोसले, डॉ. प्रविशाल आदलिंग, डॉ. हिमांशू पेंडसे, डॉ. रोशनी कावळे, डॉ. स्वप्नील लडकत, डॉ. विराज सोनवणे यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. रसिक गांधी, डॉ. ज्ञानेश्वर दुसाने यांनी काम पाहिले. 

हडपसर मेडिकल असोशियन ही मागील २५ वर्षांपासून हडपसर परिसरात कार्यरत आहे. हडपसर परिसरातील ऐकून ७५० डॉक्टर या संघटनेचे सभासद आहे. सन १९९३ साली समाजसुधारक कै. डॉ. दादा गुजर, डॉ. दिलीप माने, डॉ. रसिक गांधी, सुरेश शिखरे असोसिएशनची स्थापना केली होती. असोशियनच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे, झाडांची भिशी, आरोग्य व्याख्याने, पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे, किल्ले स्पर्धा, ग्रंथालय, वेल्हे तालुक्यातील तीन गावे दत्तक घेऊन त्याठिकाणी शालेय साहित्य, कपडे यांचे वाटप केले असे उपक्रम केले जातात. तसेच सायकल रायडर्स डॉक्टर ग्रुप, रोनोलिक्स डॉक्टर ग्रुप द्वारे समाजात व्यायामाचे महत्व पटवून देण्याचा विशेष उपक्रम असोशियनच्या माध्यमातून केला जात आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील दुर्गम भागात शाळांमध्ये ग्रंथालय तसेच महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प केला आहे.   

Web Title: President of Hadapsar Medical Association Shantanu Jagdale