राष्ट्रपती कोविंद यांचे पुण्यात आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लोहगाव विमानतळावर सोमवारी आगमन झाले. या वेळी त्यांच्यासमवेत पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या. पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाच्या मंगळवारी (ता. २३)  होणाऱ्या पदवीप्रदान समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, एअर कमोडोर के. व्ही. एस. नायर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम या वेळी उपस्थित होते.

Web Title: President of india Ram Nath Kovind arrives in Pune