उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी : संदीपान झोंबाडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

उत्तर प्रदेश मधील योगी सरकार त्वरित बरखास्त करावे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. आरोपींना आणि त्यांचा बचाव करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांना सह आरोपी करून फाशीचीच शिक्षा करावी. अशा विविध मागण्यांसह हाथरसच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर सकल मातंग समाजाच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (ता.7) आंदोलन करण्यात आले.

पिंपरी - उत्तर प्रदेश मधील योगी सरकार त्वरित बरखास्त करावे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. आरोपींना आणि त्यांचा बचाव करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांना सह आरोपी करून फाशीचीच शिक्षा करावी. अशा विविध मागण्यांसह हाथरसच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर सकल मातंग समाजाच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (ता.7) आंदोलन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संदीपान झोंबार्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष विशाल कसबे, दलित विकास महासंघाचे अध्यक्ष मारुती दाखले, विजय दणके, सुरेश जोगदंड, सुनील भिसे, वाल्मीकी समाजाचे शहराध्यक्ष राजू परदेशी, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्ष हिरामण खवळे, मातंग एकता आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन वाघमारे, अण्णा कसबे, सचिन दुबळे, अक्षय दुनघव, मानवहित लोकशाही पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू धुरंधरे, सुरेश सकट, दीपक लोखंडे, मच्छिंद्र वाघमारे, गणेश अडागळे, सविता आव्हाड, गणेश वैरागर, कष्टकरी कामगार पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, जे.डी. आल्हाट, बाजीराव नाईक, माणिक खंडागळे, नाथा शिंदे, सुभाष बनसोडे, अशोक लोखंडे, गणेश लोंढे, मनोज लांडगे, सुनील मोरे, अक्षय झोंबाडे, अविनाश सोनपारखे, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब बनसोडे, दीपक वाघ, गोपीनाथ कारके, सूरज कसबे, मीना रंधवे आदींनी सहभाग घेतला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presidential rule implemented Uttar Pradesh sandipan jhombade