प्रभावशाली राजकीय दबावगट तयार करणार - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - ‘‘देशातील असे काही विशिष्ट वर्ग आणि संघटना आहेत, ज्यांना सत्तेत अन राजकारणात कधीही संधी मिळालेली नाही. अशा वर्गाला आणि संघटनांना एकत्र आणून एक प्रभावशाली राजकीय दबावगट तयार करणार आहोत,’’ अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केली.

भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेचे सातवे अधिवेशन नऊ जूनला दुपारी दोन वाजता पुणे रेल्वे स्थानकावरील एसएसपीएमएस मैदानावर होणार आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने आणि विजय मोरे उपस्थित होते. माने म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे भटक्‍या विमुक्त जमातीला अनुसूचित जमातीत स्थान देण्यात यावे, यासाठी आंदोलन करत आहोत. आता राज्यप्रक्रियेत स्वतःच सहभागी होऊन भटक्‍या समाजाच्या उन्नतीसाठी लढणार आहोत.’’

Web Title: pressure group prakash ambedkar politics