प्रतिबंधात्मक कारवाईमुळे पालिका निवडणूक शांततेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

तीनशेहून अधिक सराईत गुन्हेगार कारागृहात
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पोलिसांच्या दृष्टीने परीक्षाच होती. परंतु काही किरकोळ प्रकार वगळता निवडणूक शांततेत पार पडली. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारी तसेच तीनशेहून अधिक गुन्हेगारांवर मोका आणि एमपीडीए कायद्याचे शस्त्र उगारल्यामुळे हा परिणाम दिसून आला.

तीनशेहून अधिक सराईत गुन्हेगार कारागृहात
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पोलिसांच्या दृष्टीने परीक्षाच होती. परंतु काही किरकोळ प्रकार वगळता निवडणूक शांततेत पार पडली. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारी तसेच तीनशेहून अधिक गुन्हेगारांवर मोका आणि एमपीडीए कायद्याचे शस्त्र उगारल्यामुळे हा परिणाम दिसून आला.

महापालिका निवडणुकीसाठी शहर पोलिस दलासोबतच बाहेरगावाहून अतिरिक्‍त बंदोबस्त मागविण्यात आला होता. तब्बल दहा हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि पोलिस सहआयुक्‍त सुनील रामानंद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. शहरातील संवेदनशील मतमोजणी केंद्रांवरही पोलिसांची कुमक वाढविण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे अनेक गुन्हेगार सध्या कारागृहात आहेत. परिणामी, या निवडणुकीत अनुचित प्रकार घडला नाही.

मोका आणि एमपीडीए कारवाईचा बडगा
पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) आणि झोपडपट्टीदादा विरोधी (एमपीडीए) कायद्याचा बडगा उगारला आहे. त्यांनी सुमारे दोन वर्षांत मोका कायद्यांतर्गत टोळ्यांमधील 228 गुन्हेगारांना कारागृहाचा रस्ता दाखविला. एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हेगारांची थेट एक वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणाऱ्या दीडशेहून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

Web Title: Preventive action in the municipal elections peaceful