चाकणला कोथिंबीर मातीमोल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

चाकण -येथील खेड कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या आवारात कोथिंबिरीची आवक एक लाख जुड्यावर झाली. कोथिंबिरीची आवक मोठी झाल्याने कोथिंबिरीचे भाव अगदी एक रुपयावर खाली आले. भाव गडगडल्याने तसेच मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने ढीग तसेच जाग्यांवर सोडून दिले.

त्यामुळे बाजारात कोथिंबिरीचे ढीग पडून राहिलेले दिसत होते. मेथीच्या जुड्यांची आवकही घटली. पंचवीस हजारांवर आवक झाली. मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात पाच रुपये असा भाव मिळाला. मेथीचे भाव ही घटले असल्याची माहिती अडते संतोष खैरे, ज्ञानेश्वर खरपासे यांनी दिली.

Web Title: prices of coriader fell to one rupee in chakan