मतदारांचा भाव घसरला; नोटबंदीमुळे सोने देणार

उत्तम कुटे
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पिंपरी -  मोठ्या चलनी नोटांवरील "सर्जिकल स्ट्राईक' मुळे देशभर सर्वसामान्यांची परवड सुरू असताना विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीमुळे या निवडणुकीतील मतदारांचा भाव घसरल्याने घोडेबाजार व पर्यायाने उमेदवारांचा खर्चही कमी होणार आहे.त्यामुळे ते काहीसे सुखावले असले, तरी त्यामुळे मतदार तेवढाच 'दुखावला' असल्याने "एमएलसी'ची ही निवडणूक "थोडा खुशी, थोडा गम' देणारी ठरणार आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद झाल्या असल्याने आता नोटांऐवजी मतदारांना सोने वाटप करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात सध्या सुरु आहे.

नोटाबंदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मतदारसंघातील प्राबल्य यामुळे यावेळी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील घोडेबाजार कमी होणार आहे. त्यामुळेच अद्याप या निवडणुकीचा भावही फुटलेला नाही.तसेच एरव्ही सुरू होणारी ही देवघेव मतदान दोन दिवसांवर येऊनही शहरात सुरू झालेली नाही. त्यामुळे 133 मतदार नगरसेवकांपैकी अनेकांची तोंडे सध्या कडवट झाली आहे. मतदारसंघातील ताकद लक्षात घेता निवडून येण्याची खात्री असल्याने राष्ट्रवादीने मतदानासाठी "व्हीप'ही अद्याप जारी केलेला नाही. तर,मतदारांकडे उमेदवारच न फिरकल्याने उमेदवारांऐवजी मतदारच अस्वस्थ असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि कॉंग्रेस अशा तिन्ही तालेवार उमेदवारांपैकी एकही भेटायला आला नसल्याचे मतदार असलेल्या पिंपरी-चिंचवड पालिकेतील विरोधी बाकावरील एका नगरसेवकाने गुरुवारी सांगितले.

Web Title: Prices fell by voters; gold will