एनसीडीईएक्स’कडून ‘अॅग्रोवन’चा गौरव

‘मार्केट इंटेलिजन्स’ वार्तांकनासाठी पुरस्काराने सन्मान
 एनसीडीईएक्स’कडून ‘अॅग्रोवन’चा गौरव
एनसीडीईएक्स’कडून ‘अॅग्रोवन’चा गौरवsakal

पुणे - भारतातील महत्त्वाचा अॅग्री कमोडिटी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असलेल्या ‘एनसीडीईएक्स’ने शेतीमाल बाजार शृंखलेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान गुरुवारी (ता.२७) केला. शेतीमालाच्या बाजारभावांबाबत शेतकऱ्यांना नियमित आणि अचूक मार्गदर्शन (मार्केट इंटेलिजन्स) करून त्यांच्या समृद्धीत भर घालण्याच्या कार्याची नोंद घेऊन ‘सकाळ-अॅग्रोवन’लाही या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज अर्थात ‘एनसीडीईएक्स’ने विविध श्रेणींमध्ये एकूण ५८ संस्थांचा गौरव केला. यात वृत्तपत्र माध्यमात ‘अॅग्रोवन’ला मानाचा पुरस्कार देण्यात आला. ‘अॅग्रोवन’सोबतच ‘हिंदू बिझनेस लाइन’ आणि ‘नफानुकसान’ या वृत्तपत्रांनाही पुरस्कार देण्यात आला. तसेच चार शेतकरी उत्पादक कंपन्या, टाटा म्युचुअल फंड, अल्फा अल्टरनेटिव्स, कोटक बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेलाही पुरस्कार देण्यात आला. व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर झालेल्या या कार्यक्रमात कमोडिटी पार्टिसिपेंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नरिंदर वाधवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक आणि दुप्पट शेतकरी उत्पन्न समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांची प्रमुख उपस्थिती होती

अचूक माहिती व विश्‍लेषण

‘अॅग्रोवन’ मागील १७ वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतींची माहिती देत आहे. शेतकऱ्यांना तालुक्याच्या बाजार समित्यांपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारभावाची अचूक माहिती, विश्‍लेषण ‘अॅग्रोवन’ मधून दिले जाते. देशातील विविध कमोडिटी एक्स्चेंजसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील सीबॉट, आयसीई, युरोपियन आणि चिनी वायदे बाजारांतील माहितीचे विश्लेषण केले जाते. सरकारचे आयात-निर्यात धोरण आणि त्याचे बाजारावरील संभाव्य परिणाम, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्लेषकांचे मत ‘ॲग्रोवन’मधून मिळते. बाजारांतील अफवांच्या काळात ‘अॅग्रोवन’ने वास्तव मांडून शेतकऱ्यांना बाजाराचा अंदाज घेण्यास मदत केली. या कार्याची दखल घेत ‘एनसीडीईक्स’ने ‘अॅग्रोवन’चा पुरस्काराने गौरव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com