लोणी काळभोरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन पुरस्कार

लोणी काळभोरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन पुरस्कार

लोणी काळभोर : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा जिल्हास्तरीय आनंदीबाई जोशी आरोग्य गौरव पुरस्कार सलग सहाव्यांदा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकावला आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत आरोग्यसेवेचे सर्व निकष पूर्ण केल्याने, स्वच्छ भारत य़ोजनेअंतर्गत जिल्ह्यात याच प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन लाख रुपयांचा प्रथम क्रमांकांचा पुरस्कार मिळाला आहे.

केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात जिल्हास्तरीय आनंदीबाई जोशी आरोग्य गौरव पुरस्कार व स्वच्छ भारत य़ोजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रथम असे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी पटकावणारे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव ठरले आहे. 

डॉ. डि. जे. जाधव यांनी आठ वर्षांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैधकिय अधिकारी म्हणून पदभार स्विकारला त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रांची फार मोठी दुरवस्था होती. मात्र जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, सरपंच व स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने जाधव विशेष लक्ष देवून आरोग्य केंद्रामध्ये झालेल्या सुधारणा केल्या.

खाजगी रुग्णालयाप्रमाणे आरोग्य सेवा, प्रशस्त इमारत, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची तत्परता, रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते या सराव कारणांमुळे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ आरोग्य केंद्राचा सन्मान झाला आहे.

आठ वर्षांपूर्वी वर्षाला सरासरी पाच ते सहा हजाराच्या आसपास असेलेली रुग्णांची संख्या सध्या सत्तर हजारावर पोहचली आहे. सध्या आरोग्य केंद्राचे वतीने महिलांना प्रसूतीसाठी आणणे, प्रसुती झाल्यानंतर आईला सकस आहार देणे याचबरोबर शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमाअंतर्गत माता व बाळासाठी कपडे, स्वच्छतेची साधने दिली जातात व त्याना घरी पोहचवण्याची सोय केली जाते.

याचबरोबर कमी वजनाच्या बाळासाठी रेडिएन्ट वाॅर्मर ही सुविधाही उपलब्ध आहे. या ठिकाणी एकूण बारा प्रकारच्या रक्त तपासणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा,तज्ञ डाॅक्टर असलेला नेत्र तपासणी कक्ष, प्रसुतीगृह, मधुमेह व ऊच्च रक्तदाबाची तपासणी, मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णासाठी ट्रॅक्शन सुविधा असून कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, डेग्यू, चिकुनगुणीया, टायफाॅइड इत्यादी आजार असलेल्या रूग्णांवरही येथे उपचार केले जातात.आरोग्य केद्राची इमारत सुसज्ज व आकर्षक असून या ठिकाणी स्वच्छता व रूग्णसेवेला प्राधान्य दिले जाते.

केंद्राची मागिल पाच वर्षातील बाह्यरुग्ण संख्या - 
२०१२-१३ - ४७१६०, ०१३-१४ - ५२८८७,
२०१४-१५ - ५२८४७,
२०१५-१६ - ६९४४१
२०१६-१७ - ७३७९८
२०१७-१८ - ६८६३६ 

आरोग्य केंद्राची आंतररुग्ण संख्या
२०१२-१३ - १५६०
२०१३-१४ - ४५२३
२०१४-१५ - ४६८६
२०१५-१६ - ४९३५
२०१६-१७ - ५६८१
२०१७-१८ - ४८७४

आरोग्य केंद्रात झालेल्या प्रसूतीची आकडेवारी
२०१२-१३ - ४५१
२०१३-१४ - ७७०
२०१४-१५ - १०२५
२०१५-१६ - १११७
२०१६-१७ - १०५८
२०१७-१८ - १०४१

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या मार्गदर्शनामुळे व स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने कामाला गती आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचारी उत्साहाने काम करीत असल्याने दिवसेंदिवस येथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वी अवघे ४० ते ५० रुग्ण उपचारासाठी येत असत, परंतू आज या परिसरात अनेक खाजगी रुग्णालये असताना देखील प्रतिवर्षी सुमारे ७० ते ७५ हजार रुग्णांची तपासणी व दरमहा ७० ते ८० महिलांची प्रसूती करण्यात येते. आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता व रुग्ण सेवेला प्राधान्य दिले जाते. 
- डॉ. डी. जे. जाधव, वैद्यकीय अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com