मांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार

कृष्णकांत कोबल
बुधवार, 11 एप्रिल 2018

मांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मांजरी खुर्द उपकेंद्रातील आरोग्य सेवक प्रवीण भराड, आरोग्य सेविका मनिषा डुचे व आशा स्वयंसेविका यांनी हा पुरस्कार स्विकारला. गौरवचिन्ह, सन्मानपत्र व रोख पंधरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आमदार दत्तात्रय भरणे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे मंडळाचे डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, सर्व समित्यांचे सभापती, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी खुर्द उपकेंद्र कार्यरत असून, उपकेंद्रात होणाऱ्या प्रसूती, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सेवा, लहान मुलांचे लसीकरण, आर.सी.एच. नोंदी, रेकॉर्ड व स्वच्छता आदी निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. मागच्या सलग तीन वर्षापासून मांजरी खुर्द उपकेंद्राला हा पुरस्कार मिळत आला आहे. अशी माहिती वाघोली केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी यावेळी दिली. 

Web Title: Primary Health Sub-Center got Anandibai Joshi Award