मोठ्या आकाराच्या सदनिकांनाही अनुदान

उमेश शेळके
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीवायएमए) अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान आता मोठ्या आकाराच्या सदनिका (2200 चौरस फुटांपर्यंत) खरेदी करणाऱ्यांनादेखील मिळणार आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने या योजनेतील सदनिकांच्या क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्यास मान्यता दिल्यामुळे हे शक्‍य होणार आहे.

पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीवायएमए) अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान आता मोठ्या आकाराच्या सदनिका (2200 चौरस फुटांपर्यंत) खरेदी करणाऱ्यांनादेखील मिळणार आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने या योजनेतील सदनिकांच्या क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्यास मान्यता दिल्यामुळे हे शक्‍य होणार आहे.

अनुदानाबरोबरच जीएसटीमध्ये चार टक्के सवलत आणि 12 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहा टक्‍क्‍यांनी मिळेल.

केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या प्रकल्पात जास्तीत जास्त 2 लाख 67 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. त्यासाठी सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाख रुपये असणाऱ्यांना 90 ते 120 चौरस मीटर क्षेत्रफळ तर 12 ते 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 110 ते 150 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी अनुदान दिले जात होते. मात्र, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांना या सदनिका सोयीच्या ठरत नाहीत. त्यामुळे या गटातील कुटुंबासाठी असलेल्या सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करावी, अशी शिफारस हुडको, नॅशनल बॅंकांपासून अनेकांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दाखल घेऊन केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने या दोन्ही गटांसाठीच्या सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार 6 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सदनिकांचे क्षेत्रफळ 90 ते 120 चौरस मीटरवरून 120 ते 160 चौरस मीटरपर्यंत करण्यास मान्यता दिली आहे. तर 12 ते 18 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या गटासाठी 110 ते 150 चौरस मीटरवरून 150 ते 200 चौरस मीटरपर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे.

मिळणारे फायदे
- 120 ते 200 चौरस मीटर (1291 ते 2152 कार्पेट एरिया असलेल्या) सदनिकांनादेखील दोन लाख 67 हजार अनुदान मिळणार
- 12 टक्के जीएसटीऐवजी 8 टक्केच जीएसटी भरावा लागणार
- 12 लाख रुपयांचे कर्ज 6 टक्के व्याज दराने मिळणार, उर्वरित कर्ज सध्याच्या व्याजदराने घ्यावे लागणार
-- घर खरेदी करताना आई किंवा पत्नीच्या जॉईंट नावाने घ्यावे लागणार

Web Title: prime minister home scheme subsidy