पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय ऊस परिषद

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. 13) पुणे दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) आयोजित "शुगरकेन व्हॅल्यू चेन- व्हिजन 2015 शुगर' या आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांचे दुपारी 3.55 वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर हेलिकॉप्टरने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 4.25 वाजता "व्हीएसआय' हेलिपॅड येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी 4.30 ते 5.45 वाजेदरम्यान ऊस परिषदेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी त्याठिकाणी आयोजित प्रदर्शनाचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील. सायंकाळी 5.50 वाजता मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेस ते भेट देणार आहेत. सायंकाळी 6.15 वाजता लोहगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.40 वाजता भारतीय हवाईदलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

Web Title: Prime Minister Narendra Modi today in Pune