पंतप्रधानांसाठी रस्ता चकाचक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंढवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे दौरा असल्यामुळे केशवनगर मांजरी रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण सुरू केले आहे. संपूर्ण रस्ता नवीन करणार असल्याची माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

केशवनगर येथील शिवाजी चौक, मांजरीदरम्यान गेल्या दोन वर्षांपासून खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रजिमा ३४ या रस्त्यावर तात्पुरते खड्डे बुजविले होते; परंतु पंतप्रधान मोदी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे येणार आहेत. त्यामुळे केशवनगर ते मांजरी रस्त्याचे दीड कोटींच्या निधीतून डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने येथील वाहतूक सुरळीत होऊन कोंडी सुटण्यास मदत झाली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Web Title: Prime Minister of the road Posh