पंतप्रधान योजनेतील घरांना सवलत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - ‘पंतप्रधान आवास योजना’ आणि ‘हाउसिंग फॉर ऑल’ या योजनेत ६० चौरस मीटरपर्यंतचे घर घेणाऱ्यांना वस्तू व सेवाकरात (जीएसटी) सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेत घर खरेदी करणाऱ्यांना १२ ऐवजी आठ टक्केच जीएसटी आकारण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या टॅक्‍स रिसर्च युनिटकडून पत्रक काढण्यात आले आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे २५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली आहे. लवकरच त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत घर खरेदी करणाऱ्यांना कमी दराने कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच एक हजार रुपये मुद्रांक शुल्क अशा सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या घर खरेदीच्या दस्तामध्ये दाखविलेल्या किमतीवर बारा टक्के जीएसटीची आकारणी केली जाते. परंतु या योजनेअंतर्गत ६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आतील घर खरेदीवर जीएसटीमध्ये चार टक्के सवलत मिळण्याची शक्‍यता आहे.

अटींची पूर्तता आवश्‍यक
जीएसटीमधील या सवलतीसाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. ‘क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी स्कीम’ (सीएलएसएस) ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंक (एनएचबी) आणि हाउसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सवलतीसाठी नागरिकांना या दोन्ही बॅंकांकडून कर्ज घेण्याची अट घालण्यात आली आहे. ही सवलत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय नागरिकांना लागू आहे.

Web Title: prime minister scheme home discount