बेरोजगारी, पाणीप्रश्‍नाला प्राधान्य - सुप्रिया सुळे

Supriya-Sule
Supriya-Sule

इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  

येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती दिली. पावसाळ्यात १०० टक्के भरलेले उजनी धरण उन्हाळ्यात उणे पातळीत गेल्याने इंदापूर, दौंड व बारामती तालुक्‍यास तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. त्यामुळे धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व्हावे तसेच धरणातील पाण्याचे प्रदूषण दूर करण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

यासंदर्भात नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन तसेच भविष्यात पाणीटंचाईस सामोरे जावे लागू नये, म्हणून जनजागृती करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली. 

या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ मोरे, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, मंगलसिद्धी दूध संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र तांबिले, अशोक घोगरे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ, शुभम निंबाळकर उपस्थित होते. या वेळी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी तालुक्‍यातील पाणीप्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनिल राऊत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com