येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने येरवडा कारागृहात आत्महत्या प्रकार आज (शुक्रवार) पहाटे उघडकीस आला.

पुणे: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने येरवडा कारागृहात आत्महत्या प्रकार आज (शुक्रवार) पहाटे उघडकीस आला.

हाडकसिंग ऊर्फ खाडकसिंग जलसिंग पांचाळ (वय 38, रा. कोटा, ता. राहता, जि. हमीपुर, उत्तरप्रदेश) असे त्या कैद्याचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करीत त्याचा खून केला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला 2013 मध्ये अटक केली. न्यायालयाने गेल्यावर्षी 22 सप्टेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आज पहाटे त्याने कापडाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: prisoner suicide in Yerawada jail