पुणे : कैद्यांना 'असा' होणार लॉकडाऊनचा फायदा

सनील गाडेकर
शनिवार, 11 जुलै 2020

लॉकडाउनमुळे पॅरोल व जामिनाच्या मुदतीत तीस दिवसांची वाढ

पुणे : गुन्ह्यातील संशयित आरोपी किंवा शिक्षा झाल्यानंतर कैदी म्हणून कारागृहात असलेल्या आरोपी आणि कैद्यांचा जामीन किंवा न्यायालयात केलेले अपील फेटाळले तर त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढत असतो. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यामुळे पॅरोल आणि जामिनावर सुटलेल्यांचा घरातील मुक्काम वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वाढलेल्या लॉकडाऊनचा या दोघांना चांगलाच फायदा होत आहे.
लॉकडाऊन वाढल्याने पॅरोल आणि जामिनाच्या मुदतीत तीस दिवसांची वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबियांसोबत आणखी काही दिवसांचा सहवास मिळणार आहे. राज्यातील अनेक कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही कैदी आणि आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हाय पॉवर समिती नेमली आहे. या समितीने अपवादात्मक व गंभीर गुन्हे वगळता बाकी गुन्ह्यांतील कैद्यांना तसेच ज्यांना अजून शिक्षा व्हायची आहे, अशा आरोपींना 45 दिवसांच्या पॅरोल आणि अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे. त्याची मुदत संपल्यानंतर संबंधिताने पुन्हा कारागृहात हजर व्हायचे आहे, असे निर्देश दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमध्ये वाढ झाली तर त्यांना आणखी तीस दिवस तुरुंगाबाहेर राहण्याची मुभा देण्यात यावी, असे त्यात नमूद होते. आतापर्यंत सुमारे 600 आरोपींना जामीन देण्यात आला असून, अडीचशे गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत ऍड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले की,  सोमवारपासून परत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जे आरोपी 45 दिवसांसाठी बाहेर आले आहेत. त्यांना या लॉकडाऊनचा फायदा होणार आहे. कारण त्यांना आता परत 30 दिवसांची मुदत वाढवून मिळूणार आहे. कोरोनामुळे जगात अनेक प्रकारे नुकसान झाले आहे. मात्र, कैदी आणि विविध गुन्ह्यातील आरोपींना लॉकडाऊन वाढल्याचा फायदा होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

45 दिवसांची मुदत संपत असल्याने व पुन्हा लॉकडाऊन लागल्याने माझ्या एका पक्षकाराच्या जामीनास 30 दिवसांची मुदतवाढ द्यावी, असा अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयाने तो मान्य केला आहे. याबाबत स्थापन केलेल्या हाय पावर कमिटीने जाहीर केलेल्या परिपत्रकात देखील नमूद आहे की, लॉकडाऊन वाढला तर आरोपीला 30 दिवसांची मुदतवाढ द्यावी. 

- ऍड. पुष्कर दुर्गे

बुलेट्स : 

- लॉकडाऊन वाढल्याने आरोपी व कैदी आणखी तीस दिवस कारागृहाबाहेर
- हाय पॉवर कमिटीने दिलेल्या निर्देशांचा फायदा
- सुमारे 600 आरोपींना जामीन मिळाला आहे
- आत्तापर्यत 250 कैदी पॅरोलवर 
- कारागृहाबाहेर आलेल्यांना मिळतोय कुटुंबाचा सहवास

(Edited by : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoners benefited of Lockdown Parole Extends by 30 days