अरे बापरे ! येरवडा कारागृहासह राज्यातील `एवढी` कारागृहे आेव्हर फ्लो...

jail.jpg
jail.jpg

पुणे : सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील कारागृहातील सात वर्षांच्या आतील शिक्षा झालेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर, पॅरोलवर सोडण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाने मे महिन्याच्या अखेर विविध कारागृहातील साडेआठ हजार कैद्यांना सोडले. त्यामुळे राज्यातील ६० कारागृहात २९ हजार ६६० कैदी असल्यामुळे कारागृहील कैद्यांचा `फ्लो’ काही कमी झाल्याचे दिसून येत नाही.

 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने कमी शिक्षा असलेल्यांना तात्पुरते जामिन तर काही कैद्यांना पॅराेल मिळाला आहे. यामध्ये मुंबई (६) , ठाणे (२०), नवी मुंबई (८६), नाशिक (३१२), येरवडा (२५०), कोल्हापूर (१७८), औरंगाबाद (२३७) आणि नागपूर (१८४) अशा मध्यवर्ती कारागृहांतील १२३७ कैद्यांचा समावेश आहे. तर येरवडा, विसापूर, धुळे, सिंधुदुर्ग, मोर्शी या खुल्या कारागृहातील ३२० कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. 

यासह कोल्हापूर, सोलापूर, लातूर, रत्नागिरी अशा जिल्हा कारागृहातील ६९९ कैद्यांना तात्पुरते जामिन मिळाले आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे कैद्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाते. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झालेली नाही. या कारागृहात दुप्पटीपेक्षा अधिक कैदी संख्या कायम राहिली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या ३३० टक्के, सोलापूर जिल्हा कारागृहात ३०६ टक्के आहे. कैदी क्षमतेच्या २०१ ते ३०० टक्के कैद्यांची गर्दी असणारी सहा कारागृहे आहेत. तर १०१ ते २०० टक्के कैद्यांची गर्दी असलेली १७ कारागृहे आहेत.

कारागृहे बंदीक्षमता बंदीसंख्या
येरवडा २४४९   ५४४२
मुंबई   ८०४ २६९८
ठाणे  ११०५ ३३४५
कल्याण   ५४० १७३९
सोलापूर    १२७   ३८२
  • मध्यवर्ती कारागृहे - ९
  • जिल्हा कारागृहे- २८ 
  • खुले कारागृहे - १९
  • विशेष, किशोर सुधारालय, महिला कारागृह, खुली वसाहत प्रत्येकी १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com