पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुण्यात आज तीन सभा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बुधवारी (ता. 15) पुण्यात तीन जाहीर सभा आणि "रोड शो' होणार आहे. 

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बुधवारी (ता. 15) पुण्यात तीन जाहीर सभा आणि "रोड शो' होणार आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील नेते प्रचारासाठी पुण्यात येत आहेत. त्याची सुरवात माजी मंत्री नारायण राणे यांच्या सभेपासून झाली. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण महापालिकेच्या निवडणूक प्रचारात उतरत आहेत. विमाननगर ते सोमनाथनगर या दरम्यान दुपारी बारा ते दीड या वेळेत "रोड शो' होणार आहे. त्यानंतर मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता येरवडा येथील चित्रा चौकात, सव्वाआठ वाजता पर्वती गाव येथील लक्ष्मीनगर आणि वानवडी गावात रात्री नऊ वाजता जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी कळविली आहे.

Web Title: Prithviraj Chavan today three meetings in Pune