पिंपरी - वाकडमध्ये खासगी बसला अपघात

संदीप घिसे 
रविवार, 8 जुलै 2018

पिंपरी - वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटली. हि घटना रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बोरीवलीहून कोल्हापूरला निघालेली एम.बी.लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९-सी व्ही, ३६९७ ) हि बस रविवारी पहाटे चारच्या सुमारास वाकड पुलाजवळ आली. चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण ३० जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना शिवाजीनगर आणि थेरगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर बस पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. हिंजवडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Private bus accident in Wakad