खासगी बस भाड्यात २० टक्के वाढ

Private-Bus
Private-Bus

पिंपरी - खासगी बस कंपन्यांनी विविध मार्गांवरील भाड्याच्या दरात २० टक्‍क्‍यांनी दरवाढ केली आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार आहे. नुकत्याच झालेल्या बस व्यावसायिकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन मुरकुटे, उपाध्यक्ष राजन जुनावणे उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर, कर, परमीट, विमा आणि देखभाल खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे खासगी बस व्यावसायिकांना सेवा चालवणे कठीण झाले. हा तोटा भरून काढण्यासाठी बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. खासगी बस कंपन्यांनी दिवाळीमध्ये बससेवेच्या दरात दुपटीने वाढ केली होती. मात्र, आता हंगाम नसताना खर्चाचे कारण पुढे करत दरवाढ केली आहे.

खासगी बसचालकांकडून सुट्यांच्या कालावधीत दरवाढ करण्यात येते. एसटी महामंडळापेक्षा खासगी बसचालकांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी कमी असतात. सुट्यातील हंगामाचे ४० दिवस वगळता अन्य ३१५ दिवस या बसचे भाडे कमी असते. 
- रामा वाघमारे, अध्यक्ष, निगडी ट्रॅव्हल्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com