प्रशासनाकडून खासगी क्लासेसवर अंकुश ठेवण्याची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 28 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : येथील कॉलेजमध्ये खासगी शिकवणी वर्ग सुरू, विद्यार्थ्यांकडून फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट आशयाची बातमी आजच्या शनिवारी (ता.28) दैनिक सकाळ व ई सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळने याबाबत केलेल्या पाठपुरव्याचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. तसेच प्रशासनाने आता कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबरोबर नारायणगाव येथील कॉलेजमध्ये देखील असे वर्ग सुरू असून त्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी कोटाचा रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाने मुलींना मोबाईलवरून एसएमएस करून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र संबधित मुलीने व पालकाने तक्रार केल्यानंतर त्यास हाकलून दिले असल्याचे सांगण्यात आले. तसेच कॉलेजने मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृहात कोटाचे पाच प्राध्यापक राहत असल्याची बाब देखील समोर आली आहे. बाहेरच्या लोकांना अशा प्रकारे मोफत अथवा भाडेतत्वावर कॉलेज कसे ठेऊ शकते अशी विचारणा पालकामधून होऊ लागली आहे.        

नारायणगाव येथील कॉलेजने वाटप केलेले कोटाचे प्रसिद्धी पत्रक कारवाईच्या मागणीसाठी सोशल मीडियावर फिरत आहे. संस्थाचालक याबाबत कार्यवाही का करत नाहीत ? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. 

शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेकडे दुर्लक्ष -
"राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईसह राज्यातील इंटीग्रेडेट कॉलेजचा गोरखधंदा जून 2018 पासून कायमचा बंद करण्यात येईल आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील वर्षापासून इंटीग्रेडेट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये. जर अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी प्रवेश घेतला तर त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही असे विधानसभेत जाहीर केले आहे"

Web Title: private classes should controlled by administartion