खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीची मुदत २५ ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ३० जुलै ते २५ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरता येणार आहे. या दोन्ही परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं.१७) ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट, शुल्क पावती आणि हमीपत्र यांसह दोन प्रतीत काढून घ्याव्यात, असेही मंडळाने सांगितले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना  
अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजीमधून सूचना दिल्या आहेत. त्या वाचून अर्ज भरावा.
अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र आवश्‍यक, आधार कार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो जवळ ठेवावा.
ऑनलाइन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत
विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

ऑनलाइन नावनोंदणी अर्जाचे तपशील
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन भरणे : ३० जुलै ते २५ ऑगस्ट
विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रात (शाळेत/महाविद्यालयात) जमा करणे : ३१ जुलै ते २७ ऑगस्ट
संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे : ३१ ऑगस्ट 

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
अर्ज भरताना अडचणी आल्यास : ०२०- २५७०५२०८/२५६७६४०५/२५७०५२७१ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
अर्ज भरताना अडचणी आल्यास : ०२०- २५७०५२०८/२५६७६४०५/२५७०५२७१ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Web Title: Private students name registration deadline August 25