विद्यापीठातील सुरक्षारक्षकांना विशेषाधिकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना "विशेष पोलिस अधिकारी' म्हणून अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विनावॉरंट अटक करण्याचे पोलिस अधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकार त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसराची सुरक्षा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले यांनी दिली. 

विद्यापीठातील या सुरक्षारक्षकांची "विशेष पोलिस अधिकारी' म्हणून एप्रिल 2018 पासून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रशिक्षण रेंज पोलिस ट्रेनिंग कॉलेज (आरपीटीसी) येथील प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून झाले आहे. विद्यापीठात सध्या 50 पुरुष आणि 10 महिला विशेष सुरक्षा अधिकारी म्हणून तैनात आहेत. या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 2010 कलम 16,17,18, 20 व 21 अन्वये 4 विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. यात विनावॉरंट अटक करणे, "लोकसेवक' असल्याचे मानणे, तसेच कर्तव्य पार पाडत असताना अधिकाऱ्यांच्या, सदस्यांच्या कृतीस संरक्षण अशा अधिकारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे "विशेष पोलिस अधिकारी' असल्याचे अधिकार 1922 आणि पोलिस बल (हक्क संरक्षण) व अधिनियम 1966 हे सुरक्षा दलाच्या सदस्यांना लागू केलेले आहेत. 

विशेष पोलिस अधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांमुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकार या सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. या अतिरिक्त सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठात पूर्वी कार्यरत सुरक्षा अधिकारीदेखील कायम राहतील. 
- सुरेश भोसले, सुरक्षा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
 
Web Title: Privileges to university security