पर्वती मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

parvati
parvati

पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते नऊ या पहिल्या टप्प्यात 5.6 टक्के मतदान झाले. बिबवेवाडीतील इंदिरानगर शाळेतील एक मशीन सकाळी नऊच्या सुमारास नादुरुस्त झाली होती.

दहा-बारा मिनिटात ती दुरुस्त केली. हा प्रकार वगळता पर्वतीमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना त्यांचा खोली क्रमांक सापडून देण्यासाठी नागरिकच मदत करत असल्याचे अरण्येश्वर विद्यामंदिर येथील केंद्रावर पहायला मिळाले.

संवेदनशील मतदान केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक मतदार केंद्रांच्या बाहेर शेड उभारण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सकाळी दहानंतर वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com