Fight With Corona : पुण्यातील कोरोना हॉस्पिटलच्या अडचणी दूर करतायेत डॉ. खेडकर

The problems of Corona Hospital in Pune are being solved by Dr Milind Khedkar
The problems of Corona Hospital in Pune are being solved by Dr Milind Khedkar

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडू लागली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरका र, पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन अहोरात्र झगडत आहे. त्यातच आता पालिकेच्या रुग्णालयातील खाटा संपल्याने खासगी रुग्णालयांमध्येही उपचार करण्यात येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील कोरोना रूग्णालयांना भेट देणे, त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणे, त्यांचे वेळीच निराकारण करणे, मागणीनुसार आवश्यक ते वैद्यकीय साहित्य आणि गोळ्या-औषधांचा पुरवठा करणे आदी जबाबदारीची कामे पुणे महापालिकेतील प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद खेडकर चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे डॉ. खेडकर हे शहरातील कोरोना रुग्णालयांचा 'पाठीचा कणा'च ठरू लागले आहेत. अर्थातच त्यांना चोवीस तास ही जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यासाठी घरदार, आई-वडील आणि मुलां-बाळांपेक्षा कोरोना  रुग्णालयांनाच अधिक वेळ द्यावा लागत आहे.

डॉ. खेडकर यांच्या पत्नी डॉ. सुनीता खेडकर ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. पत्नीला तर १४ दिवस घरी जाण्यासही मुभा नाही. त्यामुळे त्यांना निवासासाठी सोय करण्यात आलेल्या ससूनजवळच्या हाॅटेलमध्येच रहावे लागते आहे. यामुळे या डॉक्टर दांम्पत्याची मुले अक्षरशः वाऱ्यावर पडली आहेत.

डॉ. खेडकर हे मुळचे नगर जिल्ह्यातील एकनाथवाडी (ता. पाथर्डी) येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नगर येथे झाले. त्यांनी नाशिक येथील कै. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी आणि सार्वजनिक आरोग्य विषयातील पदविका (डी. पी.एच.) पुर्ण केली. त्यानंतर पुणे येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या घरी वृद्ध आई-वडील आणि दोन मुले असतात. वडिलांना मधुमेह व उच्च रक्तदाब आणि आईला संधिवात आणि उच्च रक्तदाबाचा विकार आहे. आतापर्यंत डॉ. खेडकर यांनी 
पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात काम केले आहे. स्वाइन फ्ल्युच्या साथीच्यावेळी ते डॉ. नायडू रुग्णालयात कार्यरत होते. गेल्या पाच वर्षापासुन ते पालिकेत  प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना
- नागरिकांनी सुचनांचे पालन करावे.
- लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडू नये.
- सकस आणि चौरस आहार घ्यावा.
- घरच्या घरीचा योगासने किंवा हलकासा व्यायाम करावा.
- मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकाराची वेळीच औषधे घ्यावीत.

कोरोना असताना 'तो' गावी चालत गेला; पुण्यात केला होता मुक्काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com