अकरा गावांसाठी प्रभागरचना प्रक्रिया सुरू 

अकरा गावांसाठी प्रभागरचना प्रक्रिया सुरू 

पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या गावांत दोन सदस्यांचा एक प्रभाग राहणार असून, हद्दवाढीची प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नव्या रचनेतील दोन्ही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असतील. त्यापैकी एक जागा सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गासाठी आरक्षित असेल. 

गावे समाविष्ट होऊन नुकतेच एक वर्ष झाले असून, गेल्या दहा महिन्यांपासून गावांमध्ये महापालिका प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या हद्दीची प्रभाग रचना गरजेचे असल्याचे सांगत, महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या गावांत दोन सदस्यीय प्रभारचनेला परवानगी दिली आहे. तशी प्रभागरचना करावी, अशी सूचना आयोगाने केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com