अभिनेता अक्षय खन्नासह निर्मात्यांना समन्स

akshay khanna section 375
akshay khanna section 375

पुणे - ‘सेक्‍शन ३७५’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात नकारात्मक संदेश जात असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनास मनाई करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना आणि चित्रपटाच्या दोन निर्मात्यांना ९ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिवाणी न्यायाधीश आर. एस. नाथानी यांनी हा आदेश दिला आहे. तक्रारदार ॲड. वाजेद खान पठाण आणि अमरजित म्हस्के यांनी चित्रपट निर्माता कुमार मंगल पाठक, अभिषेक मंगल पाठक आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बलात्कार पीडित महिलांना भर न्यायालयात तसेच पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांना तोंड द्यावे लागते, असे दाखविण्यात आले आहे. 

या चित्रपटामुळे समाजात नकारात्मक संदेश जाईल, त्यामुळे या चित्रपटावर मनाई हुकूम द्यावा. चित्रपटाच्या माध्यमातून नकारात्मक संदेश गेला तर भविष्यात अत्याचार होणाऱ्या महिला तक्रार करण्यास धजावणार नाहीत. यात बलात्कार पीडितांची साक्ष जाहीर  नोंदविताना दाखविले आहे. प्रत्यक्षात अशी साक्ष ‘इन कॅमेरा’ नोंदविली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com