विद्यार्थ्यांकडून 2 हजार पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची निर्मिती

Production of 2 thousand eco-friendly Ganesh idols from students
Production of 2 thousand eco-friendly Ganesh idols from students

बारामती : पर्यावरण संतुलनाचा संदेश केवळ पुस्तकातील धडे वाचून देण्यापेक्षाही स्वनिर्मितीचा आनंद घेत हा संदेश देण्याचा प्रयत्न बारामतीच्या बहुसंख्य शाळातील विद्यार्थी सध्या करताना दिसत आहेत. येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीची चळवळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविली जात आहे. यंदाही तालुक्यातील 15 शाळा यात सहभागी असून दोन हजारांहून अधिक मूर्तीची निर्मिती विद्यार्थ्याद्वारे होणार आहे. 

यंदाही शहरात जवळपास दोन हजार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची संख्या घटणार असून विद्यार्थी आपल्या हाताने घडविलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करणार असून या मुळे खऱ्या अर्थाने प्रदूषण कमी करण्यात फोरमला यश मिळाल्याचे फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना साचे, माती इत्यादी साहित्य पुरविले जात असून मुले हातांनी मूर्ती साकारत असून त्यांना यापासून नवनिर्मितीचाही आनंद मिळत आहे, मुलांच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक कुटुंबात प्रदूषणमुक्तीचा संदेशही या निमित्ताने जात असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

मुले हातानी मूर्ती साकारताना त्यांच्यामधील सृजनशीलता व कल्पकता सहज दिसते. आपणही काहीतरी करु शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करायचा नाही हा संदेश हळुहळू मुलांमुळे कुटुंबापर्यंत जाऊ लागला आहे, हेच या चळवळीचे यश आहे. गेल्या चार वर्षांपासून फोरमच्या मार्फत सातत्याने हा उपक्रम सुरु असून त्याचे यश हळुहळू समोर येऊ लागले आहे. 

या उपक्रमात सहभागी शाळा... 

म.ए.सो.चे.कै.गजानराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर,
अनेकांन्त इंग्लिश मिडीयम स्कूल, आर.एन.अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय, श्री छत्रपती शाहू  हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान  मराठी माध्यमिक हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, धो.आ.सातव (कारभारी) हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान  न्यू बाल विकास मंदिर ,पिंपळी,  श्रीमती गंगूबाई कृष्णाजी काटे देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटेवाडी,  झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूल, कटफळ, विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल, काटेवाडी हायस्कूल, काटेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com