esakal | नारळाच्या करवंट्यांपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

coconut

नारळाच्या करवंट्यांपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दोन सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील घराघरांत नारळ हा जेवणातील अविभाज्य घटक असतो. मोठ्या प्रमाणात नारळाच्या करवंट्या कचऱ्यात टाकल्या किंवा जाळल्या जातात. मालवणमधील पर्यावरणप्रेमी तरुण प्राध्यापक हसन खान यांनी यावर उपाय शोधला आहे. करवंट्यापासून आकाशकंदील, दिवे, बाउल, चमचे आदी तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांनी ‘हुनर की पाठशाला’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दिलं आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

खान म्हणाले, ‘नारळाचं झाड म्हणजे कल्पवृक्षच. याच्या फळांप्रमाणेच झावळ्या व खोडही फार उपयुक्त असतात. झावळ्या सुकवून, त्यांचे हीर काढून, ते बांधून धाडण्यासाठी लागणारे खराटे बनवले जातात. हिरव्या झावळ्यांपासूनही वेगवेगळ्या कलात्मक वस्तू घडवता येतात. नारळाच्या काथ्यांपासून दोरखंड करतात. नारळातील खोबरं काढून उरलेल्या करवंट्या कचऱ्याच्या ढिगात टाकणं किंवा जाळणं, यामुळे प्रदूषणात भर पडते. त्याऐवजी या नैसर्गिक संसाधनाचा कल्पकतेने वापर करून पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचा विचार सुचला.’’

खान यांनी असंही सांगितलं की, साडेतीन वर्षांपूर्वी ही कल्पना सुचली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने वर्षभराचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. त्यात तयार केलेल्या वस्तूंची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करू लागलो. नारळासारख्या कल्पतरूचे लोकांना टाकाऊ वाटणारे भाग फेरवापरासाठी आकर्षकपणे सज्ज करणं, हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. या कौशल्य प्रशिक्षणातून नवनीत मेस्त्री, पायल शिरपुटे, मधुरा ओरसकर, शीतल अटक, श्रेया अटक व अजय आळवे यांसारखे तरुण कलावंत तयार झाले. या तरुणांना यातून रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतील.

हेही वाचा: गणेश मंडळांना हवी स्थिर ढोल वादन करण्याची परवानगी

करवंट्यांपासून आकर्षक राख्या

गेल्या दिवाळीत चौकोनी, षटकोनी व दंडगोलाच्या आकारांचे आकाशकंदीलही लोकांच्या पसंतीस उतरले. लहानमोठे लॅम्प बनवले. खास दिवाळीसाठी करवंट्यांपासून निर्मित दिव्यांच्या बाहेरील बाजूस दशावतारी नाटक, वारली शैलीतील चित्रं काढली. गेल्या वर्षी राखीपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही करवंटीपासून तयार केलेल्या राख्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

यंदाच्या राखीपौर्णिमेला कित्येकजणांनी राख्यांसाठी आगाऊ मागणी नोंदवली. कॉफीसाठी मग, वेगवेगळ्या आकारांतील चमचे, बाउल वगैरे दैनंदिन उपयोगांसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू घडविल्या. ही उत्पादनं ‘विकल्प’ या नावाने आम्ही बाजारपेठेत आणली. विकल्प म्हणजे पर्याय.

सुतारकाम, गवंडीकाम, प्लंबिंग, घरातील विविध उपकरणांची दुरुस्ती मी स्वतः करतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही आयुष्यात उपयोगी पडणारी ही कौशल्यं शिकवावी, या उद्देशाने मी ‘हुनर की पाठशाला’ सुरू केली. माझ्या जोडीला माझी पत्नी अमरीन, हीसुद्धा यात सहभागी असते. - हसन खान, पर्यावरणप्रेमी

loading image
go to top