जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार उदासीन- प्रा. शाम मानव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

हडपसर : एखादी व्यक्ती चमत्काराचा प्रयत्न करून आर्थिक मिळकत करत असेल तर तो कायदयाने गुन्हा आहे. या जगात चमत्कार कुणालाही करता येत नाही. हे सर्व चमत्कार करणारे हातचलाखी करत असतात. अशा लोकांपासून सावध राहून स्वतःला, कुटुंबाला व समाजाला वाचावायला हवे. भुत, चमत्कार, नरबळी, देवी देवता अंगात येणे हे सगळे थोतांड असून भोंदुबाबा पासून स्त्रियांनी सावध रहावे, कारण प्रत्येक वृक्षाची सावली पडते. त्याचप्रमाणे प्रत्येक बाबा बायांच्या मागे असतो, असे सांगून अनेक बाबांनी बायांना गंडवुन त्यांचे लैंगीक शोषण कसे केले हे उदाहरणासहित अ. भा. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.

हडपसर : एखादी व्यक्ती चमत्काराचा प्रयत्न करून आर्थिक मिळकत करत असेल तर तो कायदयाने गुन्हा आहे. या जगात चमत्कार कुणालाही करता येत नाही. हे सर्व चमत्कार करणारे हातचलाखी करत असतात. अशा लोकांपासून सावध राहून स्वतःला, कुटुंबाला व समाजाला वाचावायला हवे. भुत, चमत्कार, नरबळी, देवी देवता अंगात येणे हे सगळे थोतांड असून भोंदुबाबा पासून स्त्रियांनी सावध रहावे, कारण प्रत्येक वृक्षाची सावली पडते. त्याचप्रमाणे प्रत्येक बाबा बायांच्या मागे असतो, असे सांगून अनेक बाबांनी बायांना गंडवुन त्यांचे लैंगीक शोषण कसे केले हे उदाहरणासहित अ. भा. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. शाम मानव यांनी सांगितले. तसेच त्यांनी बाबा-बूवा हातचलाखीने तसेच धर्म, देवाच्या नावाखाली कसे फसवितात याची प्रात्यक्षिकेही करून दाखविली.

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोना विरोधी कायदा यावर आयोजीत जाहिर व्याख्यानात प्रा. मानव बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, संपर्क प्रमुख संध्या बागवे, गव्हर्नींग बॅाडी सदस्य कमल खेतान, पश्चीम महाराष्ट्र प्रमुथ मीलींद बागवे, रविंद्र शिर्के, अनुप मेहता, राजू थोरात, संजय आंगरे, गौरव जोशी उपस्थित होते. 

प्रा. मानव पुढे म्हणाले, जादुटोणाविरोधी कायदा हा सर्वसमावेश आणि सर्वच प्रकारच्या अघोरी प्रथा तसेच जादुटोण्यांवर प्रतिबंध घालणारा आहे. इतका व्यापक आणि मोठा कायदा देशात अन्य कोणत्याही राज्यात नाही. हा कायदा देव धर्माच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासोबतच वाईट चालीरितींना प्रतिबंध घालणारा आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावीपणे अंमलबजावनीसाठी सरकारची उदासीनता पाहून खंत वाटते असे नमूद करून या कायदयाच्या प्रचार व प्रासारासाठी समती स्वत: नागरिकांच्या मदतीवर खर्च करते. अंधश्रध्देच्या गर्तेत समाज अडकला असुन समाजातील या लाचारीचा फायदा अनेक भोंदूबाबा घेत आहेत. या जगात कुठेही चमत्कार होत नाही, तसेच कुणालाही सिध्दी प्राप्त होत नसते. त्यामुळे भ्रमाच्या जगामध्ये वावरून स्वतःची वाताहात करून घेवू नका, असे श्याम मानव यांनी यावेळी नमूद केले.

कांबळे म्हणाले, जादुटोणाविरोधी कायद्यात देव, धर्माला विरोध नाही तसेच कोणत्याही धार्मीक कृत्याच्या आड कायदा येणार नाही. परंतु देव, धर्माच्या नावावर कुणी दुकानदारी थाटल्यास मात्र कायद्याने तो दोषी ठरेल. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरीकांना वाईट प्रथांपासून सुटका देणारा हा कायदा आहे.

Web Title: prof sham manav criticizes govt for Anti-Superstition and Black Magic Act implementation