पोलिसांकडून व्यावसायिक मानकांनुसार कौशल्य अपेक्षित : जयस्वाल

नानवीज (ता. दौंड) : राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन समारंभप्रसंगी निरीक्षण करताना पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल.jpg
नानवीज (ता. दौंड) : राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन समारंभप्रसंगी निरीक्षण करताना पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल.jpg

दौंड : राज्य राखीव पोलिस दलाकडून व्यावसायिक मानकांनुसार शिस्त, उत्तम संचलन, कवायत आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अपेक्षित आहे. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर नेहमी उत्तम व अचूक प्रशिक्षण घेत स्वतःचे सामर्थ्य वाढवावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केले. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज (शुक्रवार) साठाव्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, ''राज्य पोलिस दलात राज्य राखीव पोलिस दल हा फार महत्त्वाचा व उत्तम घटक आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत या दलाने वेळोवेळी भाग घेतला असून महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात उत्तम प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या दलाने चांगली कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाचा प्रमुख म्हणून मी व राज्य राखीव पोलिस दल हे पोलिस कल्याण संबंधीच्या कामात कोठेही कमी पडणार नाही. राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपायांवर स्वत:ची, राष्ट्राची व कुटुंबाची जबाबदारी आहे. नवप्रविष्ठ पोलिस शिपायांनी आपल्या कोणत्याही कृत्याने कुटुंबीयांना तोंड दाखवायला अडचण होईल, अशाप्रकारचे कृत्य करू नये.''

७६६ नवप्रविष्ठ सशस्त्र पोलिस शिपाई या वेळी राज्य राखीव पोलिस दलात दाखल झाले. अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांनी प्रास्ताविक केले. उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, महेश घुर्ये, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, समादेशक श्रीकांत पाठक, रामचंद्र केंडे, तानाजी चिखले, पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या मनिषा दुबुळे, राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नीलेश अष्टेकर आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते. पोलिस शिपाई वैभव गंगावणे यांनी दीक्षांत संचलनाचे नेतृत्व केले. सीताराम नरके व वैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी आभारप्रदर्शन केले.               

अष्टपैलू प्रशिक्षणार्थी महेश ठाकरे 

अपर पोलिस महासंचालक यांच्याकडून प्रशिक्षण काळात आंतर व बाह्यवर्गात प्रथम क्रमांक संपादित करणार्या महेश पंडितराव ठाकरे (धुळे) या जवानास मानाची बॅटन प्रदान करण्यात आली. प्रशिक्षण काळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रामेश्वर कदम (नवी मुंबई), नितेश राठोड (गोंदिया), साजिद शेख ( हिंगोली), वैभव गंगावणे (नागपूर), प्रतिक श्रीराव (अमरावती), शुभम बाबर (दौंड), प्रमोद महोरकर (दौंड), अभय भवरे (दौंड), राजकुमार डोये (गोंदिया), अनिकेत भकणे (गोंदिया), गजानन निकम (सोलापूर) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com