पुण्यात प्राध्यापकला पालकांकडून मारहाण; विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे : पुण्यात प्राध्यापकाला पालकांकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्राध्यापकाने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालक या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जमले असून वातावरण तापले आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील शिक्षा अकॅडमीत नववी ते आयटीआय पर्यंतचे वर्ग चालवले जातात. येथे येणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात जाब विचारायला गेलेल्या पालकांना तसेच उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे परिसरात वातावरण तापले असून दोषी क्लास चालक आणि पोलिस कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी सर्वपक्षीय नेते आनंदनगर येथील सिंहगड पोलिस ठाणे येथे उपस्थित होते. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, निलेश गिरमे, महेश पोकळे, शिवा पासलकर, दत्ता रायकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा स्वाती पोकळे माजी नगरसेवक विकास दांगट आणि इतर राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A professor beaten by parents due to Allegations of sexual exploitation of students in Pune