प्राध्यापक भरतीवरील बंदी उठणार

teacher
teacher

पुणे - प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेवर गेल्या दीड वर्षापासून असणारी बंदी लवकरच उठण्याची शक्‍यता आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीने आपली मते मांडत प्रक्रियेला मान्यता दिली आहे. या भरतीवरील बंदी उठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच निर्णय होईल, असे उच्च शिक्षण विभागाने सूतोवाच केले आहे.

प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर मे २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी, यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिर्व्हसिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एमफुक्‍टो) माध्यमातून प्राध्यापकांनी वेळोवेळी आंदोलने केली. आता भरती प्रक्रियेच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील जवळपास एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण सुमारे ६६ हजार ४८३ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यात ३४ हजार ५३२ शिक्षक आणि ३१ हजार ९५२ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यातील ४८ हजार १७४ पदांवर भरती झालेली आहे. तर, १८ हजार ३०९ जागा सध्या रिक्त आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी दिली.

प्राध्यापक/शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा आढावा
तपशील                                          पुणे        राज्य

अनुदानित महाविद्यालयांची संख्या    १६७       ११७१
प्राध्यापकांच्या मंजूर जागा               ५,८३८    ३४,५३१
भरती झालेल्या जागा                       ४,३७३    २५,०२५
*रिक्‍त जागा                                   १,४६५    ९,५११

तपशील                                           पुणे         राज्य
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर जागा    ५,५१२    ३१,९५२
भरती झालेल्या जागा                         ३,७९३    २३,१५४
*रिक्त जागा                                     १,७१९    ८,७९८

प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला उच्चाधिकार समितीने आपली मते मांडत मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडून भरतीसाठी लवकरच मंजुरी मिळेल. या संदर्भात काही दिवसांत आदेश काढण्यात येईल आणि वर्ष संपण्यापूर्वी भरती प्रक्रिया सुरू होईल.
- डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग

एमफुक्‍टोच्या शिष्टमंडळ आणि शिक्षणमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्राध्यापक भरतीवरील बंदी लवकरच उठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते, परंतु अद्याप ठोस माहिती दिलेली नाही.
- एस. पी. लवांडे, सरचिटणीस, एमफुक्‍टो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com