'सिंहगड'च्या प्राध्यापकाने दिला जीवन संपवण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे.

पुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे.

मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून ताकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून टाकण्याच्या निर्णयाचे पत्र मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे.

सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमधील सूरज माळी या प्राध्यापकानी थकीत पगाराबाबत विचारणा केली असता, त्याना योग्य न्याय मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळली होती. त्याचा व्हीडीओ देखील नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्राध्यापकाने जीवन संपवून टाकत आल्याचे पत्र लिहिले आहे. अचकपणे कामावरुन कमी करण्यात आले, तसेच थकित पगारही संस्थेने दिला नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही संस्थेतील संबंधितांनी दखल घेतली नाही, त्यामुळे आता जीवन संपवित आहे, असे माळी यांनी पत्रात लिहिले आहे.

Web Title: Professor from sinhagad college warns of suicide