शिरसगाव काटा येथील प्राध्यापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मांडवगण फराटा - शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली. बाळकृष्ण धारबापू कोळपे (वय ४७), असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

याबाबत कोळपे यांचे चुलते अण्णासाहेब यशवंत कोळपे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अण्णासाहेब कोळपे हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. त्या वेळी बायसाबाई कोळपे या घराच्या टेरेसवर गेल्या. त्या वेळी त्यांना दीर बाळकृष्ण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसून आले. 

बाळकृष्ण कोळपे हे बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या ज्युनिअर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. तेथेच पत्नी व एक मुलगा यांच्यासह राहत होते. सध्या कॉलेजला सुटी असल्यामुळे आपल्या गावी शिरसगाव येथे आले होते. त्यांना पोटदुखीचा त्रास होता. दोन दिवसांपूर्वी हंगेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे उपचार घेतले होते. त्यानंतर पुण्यात उपचार घेण्यासाठी ते जाणार होते. पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास मांडवगण पोलिस चौकीचे पोलिस हवालदार आबासाहेब जगदाळे, श्रावण गुपचे करत आहेत. दरम्यान, बाळकृष्ण कोळपे हे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादासाहेब कोळपे यांचे धाकटे बंधू होते.

Web Title: professor suicide