प्राध्यापकाचा विष पिण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

पुणे : कर्वे रस्ता परिसरातील आदर्श शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉ. माधव पगारे यांनी उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयात विषारी कीटकनाशक पिण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार टळला. या प्रकरणी डॉ. पगारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नोकरीस रुजू झालेल्या दिवसापासून निवृत्तिवेतनासह आर्थिक लाभ मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. डॉ. नारखेडे यांनी सांगितले की, पगारे हे 15 जून 1992 मध्ये प्रवरानगर येथील एका कायम विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयात नोकरीस आले. त्या वेळी त्यांच्याकडे नोकरीसाठी आवश्‍यक असलेले 55 टक्के गुण नव्हते. 1993 मध्ये त्यांनी ते गुण मिळविले. त्या वेळच्या नियमानुसार त्यांना नोकरीसाठी नेट-सेट वा पीएचडी ही अर्हता सक्तीची झाली. त्यातून सूट मिळविण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली आहे. 

''डॉ. पगारे यांना 2009 मध्ये पीएचडी मिळाली; परंतु 1992 पासून सर्व आर्थिक लाभ मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. ती कायदेशीर नाही. या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी सहसंचालक कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही रोखला; परंतु आज नाही तर उद्या विष प्राशन करीन, अशी त्यांची भाषा असल्याने त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.'' 

बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बहादरपुरे म्हणाले, ''डॉ. पगारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांच्या फिर्यादीवरून पगारे यांच्या विरोधात 309 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.'' 

Web Title: Professor threatened College Administration in Pune