तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापक अनेक महिन्यांपासून पगाराविना

technical
technical

पुणे  - राज्यात इंजीनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीए या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या  प्राध्यापकांचे तीन ते २७  महिन्याचे वेतन संस्थाचालकांनी दिलेले नाही. संस्थामधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे थकित वेतन मिळावे यासाठी 'टॅफनॅफ' संघटनेने मुख्यमंत्र्यांनाकडे मागणी केली आहे.

'कोरोना' आपत्तीच्या काळात कोणालाही नोकरीवरून काढू नये व कामगारांचे वेतन द्यावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक एका दिवसाचा पगार देऊन मदत करत असताना दुसरीकडे तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना स्वतःचे वेतन मिळावे यासाठी धडपडावे लागत आहे. टॅफनॅफ संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच यावर काही उपाय सुचवले आहेत. 

विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व विभागातील तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत माहिती संकलित करावी, ज्या संस्थांना समाज कल्याण खाते, शिक्षण विभाग अथवा शासनाच्या ईतर कोणत्याही विभागाकडून स्कॉलरशिप यासह कोणत्याही स्वरुपातील रक्कम प्रलंबित असेल तर  ती रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनाची रक्कम म्हणून जमा करावी. ही रक्कम अपूरी असेल तर  थकित वेतनासाठी आवश्यक असणारी जादाची रक्कम शासनाकडून संस्थेच्या सर्व संचालकांच्या नावे कर्ज म्हणून देण्यात यावी. या कर्जाची नोंद संस्थाचालकांची वैयक्तिक मालमत्ता व संस्थेच्या मालमत्तेवर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात यावेत. या रकमेतून सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व थकित वेतन देण्यात यावे.

राज्यातील ८० टक्के संस्थांमधील प्राध्यापकांचे वेतन थकलेले आहे. 'कोरोना' च्या काळात आधार म्हणून वेतन मिळणे गरजेचे आहे, यावर निर्णय घ्यावा अशी मागणी 'टॅफनॅफ' संघटनेने केली आहे.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com