आंबोलीला दाऱ्याघाटाचे कामासाठी युवा समितीच्या वतीने कार्यक्रम

दत्ता म्हसकर
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

जुन्नर - दाऱ्याघाटाचे पायथ्याशी आंबोली ता.जुन्नर येथे दाऱ्याघाटाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आज मंगळवार ता.02 रोजी रुद्राअभिषेक करून शंभू महादेवास साकडे घालण्यात आले.  

जुन्नर - दाऱ्याघाटाचे पायथ्याशी आंबोली ता.जुन्नर येथे दाऱ्याघाटाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आज मंगळवार ता.02 रोजी रुद्राअभिषेक करून शंभू महादेवास साकडे घालण्यात आले.  

दाऱ्याघाट युवा फाऊंडेशन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षीय व राजकीय विचार बाजूला ठेऊन या प्रलंबित प्रश्नासाठी एकत्र लढा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करून हा अनेक वर्षाचा चार तालुक्यांना फायदा होणार असणाऱ्या दाऱ्याघाटाचा प्रश्न मार्गी लावू असे समितीचे प्रमुख चंद्रकांत काजळे यांनी सांगितले. यावेळी समितीच्या सदस्यांनी येणाऱ्या काळात जर दाऱ्याघाटाचा प्रश्न सुटला नाही तर जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय जाहीर केला.  

यावेळी आशा बुचके, सभापती ललिता चव्हाण, भाऊ देवाडे, दिलीप गांजळे, माऊली काजळे, रविंद्र काजळे,आंबोलीच्या सरपंच दीपाली दाते, मारुती वायाळ, काळू शेळकंदे, सचिन चव्हाण, गोरक्ष कौदरे बाळासाहेब वाघमारे, रामदास आमले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Program on behalf of the Youth Committee for the work of amboli ghat