जुनी सांगवीत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त 'सकाळ'तर्फे नवोगतांचे स्वागत

रमेश मोरे
सोमवार, 18 जून 2018

'सकाळ' पिंपरी चिंचवड विभागाचे सहयोगी संपादक श्री. अविनाश चिलेकर यांनी नवोगतांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जुनी सांगवी - येथील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे व नुतन माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेश उत्सवानिमित्त 'सकाळ' माध्यम समुहाच्या वतीने नवोगतांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाची सुरवात शिक्षणाची गुढी उभारून करण्यात आली. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवोगतांचे 'सकाळ'च्या वतीने गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके चिमुकल्यांच्या हाती देवुन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी 'सकाळ' पिंपरी चिंचवड विभागाचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांनी नवोगतांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण स्पर्धेच्या या युगात स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी अवांतर वाचन असणे गरजेचे आहे. याचसाठी 'सकाळ' मधून येत्या २८ जुनपासून विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी 'फुल टु धमाल, फुल टु स्मार्ट' हे स्वतंत्र पान 'सकाळ' मधून विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहेत. अवांतर वाचनासोबत यात प्रश्नावली असून विद्यार्थ्यांना यातून एक कोटी रूपयाची बक्षिसहीे दिली जाणार आहेत.

याचबरोबर दहावी विद्यार्थ्यांना दहावी अभ्यास मार्गदर्शन या पानातून सुरू केले जात आहे. यात विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे कसे जावे. प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत, आत्मसात करावीत. याची सखोल माहिती व मार्गदर्शन 'सकाळ' मधून मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. दहावी शालांत परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे हे होते. तर 'सकाळ' समुहाचे विनोद पाटील वरिष्ठ व्यवस्थापक वितरण विभाग, सुनिल फलफले, सहाय्यक व्यवस्थापक वितरण, परशुराम सैद, योगेश घाग, संस्थेचे, परशुराम मालुसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी केले. तर सुत्रसंचलन दत्तात्रय जगताप यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The program was organized by the sakal at school premises at juni Sangvi