भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा (इस्रो) शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘युविका’ हा कार्यक्रम

ISRO
ISRO

पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) या उन्हाळ्याच्या सुट्टीत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना, ते शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे याचा परिचय करून दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडा लागावी तसेच, त्यांना आपल्या देशाने अवकाशविज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेल्या भरारीची कल्पना यावी, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. ही कार्यशाळा दोन आठवड्याची असेल. त्यात तज्ज्ञांची व्याख्याने, प्रयोगशाळांना भेटी, शास्त्रज्ञांशी थेट भेट आणि गप्पा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. या कार्यशाळेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था, प्रवास खर्च इस्रोकडून केला जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांसह त्यांना सोडायला व माघारी न्यायला येणाऱ्या एका पालकाचा रेल्वेचा खर्चही (एसी- टू टायर) इस्रोकडून केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच, अवांतर विषयातील प्रगती यावरून प्रत्येक राज्यातील मुख्य सचिवांना  प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थी इस्रोच्या https://yuvika.isro.gov.in/yuvika/  या वेबसाईटवरूनही अर्ज करू शकतात. हे अर्ज २५ मार्च ते ३ एप्रिल २०१९ या काळात करता येतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘इस्रो अध्यासना’च्या प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com