दापोडीत पदपथाचे व चेंबरचे काम प्रगतीपथावर

रमेश मोरे
गुरुवार, 24 मे 2018

जुनी सांगवी - दापोडी येथील एस.टी.कार्यशाळा वळण रस्ता ते सांगवी दापोडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत करण्यात आलेल्या पदपथ व चेंबरचे काम पुर्ण झाले आहे. पुर्वीचा खड्डेमय रस्ता, वर खाली असलेली चेंबरची झाकणे यामुळे वहातुकीस होणारा अडथळा, अपघात टळणार आहेत. याचबरोबर पुलापर्यंत केलेल्या पदपथामुळे नागरीकांना पायी चालणे सोयीस्कर ठरणार आहे. 

दापोडी सांगवी हा मार्ग नेहमी वर्दळीचा असतो. सांगवीतुन पिंपरी भोसरीकडे दापोडीतुन जावे लागते. येथे  दैनंदिन कामासाठी दापोडीकडे पायी चालत जाणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुर्वीचा येथील खड्डेमय रस्ता, भरधाव येणारी वहाने यामुळे नागरीकांना पायी चालणे जिकिरीचे होते. जुन्या पदपथाची ठिकठिकाणी फरशा निघुन दुरावस्था झाली होती. तर विविध विकास कांमाच्या खोदकामामुळे हा रस्ता खड्डेमय झाला होता.

नविन पदपथ, रस्त्याचे झालेले डांबरीकरण, दुरूस्ती झालेले चेंबर यामुळे या रस्त्याचे रूपडे बदलले आहे.  यामुळे सकाळी फिरायला येणा-यांची संख्याही या पदपथावर वाढणार आहे.

Web Title: The progressive work of chamber and chamber work in progress