बनावट सहीने मिळवली बढती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

वडगाव शेरी - नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बिगारी म्हणून काम करणाऱ्या एका सेवकाने पालिका उपायुक्तांची सही करून, मुकादम पदाची आणि नंतर काही दिवसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहायक म्हणून बढती घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

याबाबत वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने यांनी महापालिकेच्या परिमंडळ एकचे उपायुक्त विजय दहिभाते यांना माहिती दिली आहे. दीपक विलास गायकवाड असे या बिगारी सेवकाचे नाव आहे. त्याने २३ एप्रिल २०१८ रोजी आज्ञापत्रक तयार करून, त्यावर उपायुक्तांची सही केलेली आहे. या आज्ञापत्रकात वैद्यकीय अधिकारी परिमंडल एक यांचे मदतनीस म्हणून कामकाज पाहण्यात यावे, असा उल्लेख आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस देऊन चोवीस तासांत खुलासा मागवला आहे. 

परिमंडळ एकचे उपायुक्त विजय दहिभाते म्हणाले, ‘‘मी कोणालाही अशी बढती दिलेली नाही. याबाबतचा अधिकार मला नाही. हे प्रकरण गंभीर  आहे.

Web Title: promotion bogus signature crime